Thursday, August 13, 2020

Amar M Thombare Shabda Sanwad features

 


प्रा.अमर ठोंबरे - शब्दसंवाद फीचर्स


शब्दसंवाद फीचर्सबद्दल थोडी माहिती -
शब्दसंवाद हे माध्यम समाज माध्यम आहे. सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक, क्षेत्रात काम करणारे, आणि  याव्यतिरिक्त केवळ पोटापुरती रोजी रोटी कमावणारे, निरक्षर असूनही साक्षर असणाऱ्याना धडे देणारे अशा अनेक व्यक्तीचा जीवनपट हे माध्यम मूर्त रूपाने उभे करणार आहे.
मागील काही वर्षंपासून वेगवेगळ्या माध्यमातून सामजिक, अध्यात्मिक , सांस्कृतिक क्षेत्रात शब्दसंवाद कार्यरत आहे. अनेक माणसांची ओळख यातून झाली आहे. आपणही आपल्या परिसरातील अशी काही माणसे असतील तुमच्या पाहण्यात असतील तर जरूर कळवा.

ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा डोळे विस्फारून टाकणारा अफाट पसारा आपण रोजच पाहतो आहोत. शेकडोच्या संख्येने असणाऱ्या वृत्त वाहिन्या, ज्ञान, विज्ञानाची माहिती देणारी गुगलसारखे माहितीचे मायाजाल मती गुंग करून टाकणारे आहे. परंतु असे असूनही अनेकदा आपण आपल्याला हव्या असणाऱ्या परंतु माहितीच्या मायाजालात न सापडणाऱ्या अनेक गोष्टीपासून दुरावलेले असतो.खरंतर लहानपनापासून आपण जी माणसे पाहिलेली असतात, त्यांना आपण चांगले पारखलेले असते पण ती सामान्य असूनही त्यांचे असामान्यपण सहजी लक्षात येत नाही. जेव्हा कधी आपण जगरहाटीच्या, व्यवहाराच्या कोरड्या पण आवश्यक असणाऱ्या बाजाराचा एक भाग बनतो तेव्हा आपण मोठे झालेले असतो.इतरांचा आणि या आपल्या माणसांचा फरक आपल्या चौकस मनाला समजल्याशिवाय राहत नाही. ही माणसे आपल्याला मोठे करून मावळतीला निघालेली असतात. आपला भवताल समृद्ध करतात. जगण्याची ऊर्जा आणि जीवनाला नवा आयाम देतात. ही माणसे नसतात कुणी लेबल लावलेली मोठी माणसं, नसतात कवी आणि लेखक, नसतात कुणी सेलिब्रेटी आणि नायक. जे काही असतात ते त्यांच्या मर्यादित जीवनात जगणारे, कोणतेही  तत्वज्ञान न सांगणारे ना कोणत्या विचारांचा काथ्याकूट करून दुसर्याच्या माथी  मारणारे, स्वतः ला विद्वान वगैरे समजणारे, ना एखाद्या इझम मध्ये पडणारे. म्हणूनच ही माणसे कधी समाजातील रुळलेल्या प्रसार माध्यमातून कुणाला दिसत नाही. आणि नाही कुणा माध्यमांच्या नजरा या लोकांकडे वळत.पण ही माणसे असतात मात्र मोठी,  इतरांच्या जीवनाला अन जगण्याला नवा आयाम देणारी! 
समाज्याच्या सर्व स्तरात ही मंडळी वावरताना दिसतात. प्रसिद्धी  पराङ्मुख असतात एवढे फारतर त्यांच्या बाबतीत म्हणता येईल .पण हीच माणसे असतात एखादया कथा, कादंबरीचा विषय, त्यांच्या व्यक्तित्वातुन साकारू शकतात भविष्यातले गगन भरारी मारणारे नवोदित पंख! 
या सर्व ज्ञात अज्ञात  माणसांचा धांडोळा घेणारे आहे, शब्द संवाद फीचर्स त्यांचे चांगले गुण समाजासमोर आणणार आहे.

प्रा.अमर ठोंबरे :
शिक्षण - एम ए बी एड, (पीएच. डी. ) संशोधन कार्य सुरू (मुंबई विद्यापीठ) 
मराठी हा विषय घेऊन सन 2000 साली एम.ए.पूर्ण. तसेच शिक्षणशास्त्र पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समग्र वाङ्मयाचा चिकित्सक  अभ्यास हा प्रबन्ध विषय घेऊन पीएचडी संशोधन कार्य सुरू आहे.
कार्यक्षेत्र - मागील 20 वर्षपासून  सातत्याने वर्तमानपत्रात कधी बातमीदारी तर कधी स्तंभलेखन केले आहे. दैनिक गावकरी मध्ये कानोसा नावाचे सदर काही काळ चालविले. राजकीय, सामाजिक  व आध्यात्मिक स्वरूपाचे लेखन आजही सुरूच आहे.
प्रकाशित साहित्य- वारकरी गौरव ग्रंथ, प्रथम व द्वितीय  आवृत्ती. 
जत्रेतील पुढारी, कुस्ती, शेवंता ह्या ग्रामीण कथा स्थानिक वर्तमानपत्रात  प्रसिद्ध
तसेच ' घुंगरू कडाडलं' या चित्रपटाचे पटकथा तथा संवाद लेखन (अप्रकाशित)
श्रीमंत सौभाग्यवती या नाटकाचे लेखन (अप्रकाशित) 
संचालक - शब्दसंवाद फीचर्स 
शैक्षणिक - पत्रकारितेसोबत अध्यापन क्षेत्रांतही मागील 10 वर्षपासून कार्यरत आहे. पुणे विद्यार्थी गृह या नामांकित संस्थेत वरिष्ठ अधिव्याख्याता म्हणून 7 वर्ष काम.
सांस्कृतिक कार्यकर्मात सहभाग तसेच नाशिक येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालयात पार पडलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुख्य परीक्षक म्हणून निमंत्रित. यांबरोबरच काव्य वाचन, गायन, यात सहभाग व विशेष आवड,
संत तुकाराम व वर्तमान जीवन हा व्याख्यान विषय .मागील काही वर्षपासून विविध महाविद्यालयात या विषयावर निरूपण.
याशिवाय लोककलेतील बहुरूपी, या कलावंतावर विशेष लेखन प्रसिद्ध.
संत निवृत्तीनाथ संस्थान त्र्यंबकेश्वर येथे काही वर्षे प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम केले आहे. हे करत असताना वारकरी चळवळ उभी केली. दारूबंदी, व्यसनमुक्ती साठी विशेष आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.
वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या नाशिक शाखेचे जिल्हा सचिव म्हणून सध्या कार्यरत आहे.









शब्द संवाद फीचर्स चे प्रकाशित झालेले काही लेख :









संपर्क :
प्रा. अमर ठोंबरे (शब्द संवाद फीचर्स)
9325527180
8080590070

No comments:

Post a Comment

Amar M Thombare Shabda Sanwad features

  प्रा.अमर ठोंबरे - शब्दसंवाद फीचर्स शब्दसंवाद फीचर्सबद्दल थोडी माहिती - शब्दसंवाद हे माध्यम समाज माध्यम आहे. सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक,...