Wednesday, September 30, 2026

Dr. Yogesh D. Wankhede: Psychologist, Counsellor, Behavioral Trainer

 Dr. Yogesh D. Wankhede: Psychologist, Counsellor, Behavioral Trainer


 

डॉ. योगेश देविदास वानखेडे

(मानसशास्‍त्रज्ञ, समुपदेशक व प्रशिक्षक)

शिक्षण : Ph.D, M.Phil., M.A. Psychology, SET, B.Ed., A.D.C.A.

मागील 30 वर्षांपासून मानसशास्र या विषयाचे अध्यापन.

            सध्या नाशिक येथील महात्‍मा गांधी विद्यामंदिर संस्‍थेच्‍या लोकनेते व्‍यंकटराव हिरे स्‍वायत्‍त महाविद्यालयातील मानसशास्‍त्र विभागात कार्यरत. तसेच स्‍वायत्‍त महाविद्यालयाच्‍या अभ्‍यासमंडळाचे सदस्‍य आहेत.

            मानसशास्‍त्रीय समुपदेशन व प्रशिक्षण सेवा देणा-या ‘माईंडसर्च कौन्‍सेलिंग’ या संस्‍थेचे ते संचालक आहेत. या माध्‍यमातून करिअर व शैक्षणिक कौन्‍सेलिंग, मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांचे उपयोजन, शैक्षणिक कौशल्‍ये, विवाहपूर्व व वैवाहिक समुपदेशन, पालकत्‍त्‍व, औद्योगिक समुपदेशन व प्रशिक्षण, सॉफ्ट स्‍कील्‍स प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्‍ये प्रशिक्षक म्‍हणून योगदान दिलेले आहे.

2007 पासून माईंडसर्च कौन्सेलिंग या स्‍वत:च्‍या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना करिअर कौन्‍सेलिंग व गायडन्स ही विशेष सेवा देत आहे. यामध्ये आय.क्यु. टेस्‍ट, ॲप्टिट्युड टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट, करिअर इंटरेस्‍ट टेस्‍ट इत्यादी मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांच्‍या द्वारे विद्यार्थ्‍यांना आपल्‍या उपजत क्षमता व गुणवैशिष्‍ट्यांना अनुकूल करिअर निवडण्‍यासाठी मार्गदर्शन केले जाते. याच माध्‍यमतातून अनेक शाळा, शैक्षणिक संस्‍था, कोचिंग क्‍लासेस, सामाजिक संस्‍था यांच्‍या समवेत ॲप्टिट्युड टेस्ट, करिअर गायडन्स, पॅरेंटींग या विषयांवर उपक्रम घेतले आहेत.

अनेक औद्योगिक संस्थांमध्ये कार्यप्रेरणा, कार्यसमाधान, वर्क-लाईफ बॅलन्स, स्ट्रेस मॅनेजमेंट, सॉफ्ट स्कील्स यावर आधारित कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम दिले आहेत.

मुंबईच्या टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) यांचेकरिता नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण हॉस्पिटल्समध्ये कौन्सेलिंग सुपरवायजर म्हणून सेवा दिलेली आहे.

ज्ञानप्रसाराच्‍या उद्देशाने स्‍थापन झालेल्‍या ‘संयोग पब्लिकेशन’ या शैक्षणिक प्रकाशन संस्‍थेचे संचालक आहेत. या माध्‍यमातून त्‍यांनी अनेक संदर्भ पुस्‍तके, क्रमीक पुस्‍तके, अध्‍ययन साहित्‍य व माहितीपूर्ण वाचनिय पुस्‍तकांच्‍या निर्मितीमध्‍ये योगदान दिलेले आहे.

आय.आय.टी. खरगपूर ही प्रतिष्ठित संस्‍था व स्‍वयंम-एन.पी.टी.एल. पोर्टल यांचा इमोशनल इंटेलिजन्‍स हा कोर्स त्‍यांनी यशस्‍वीरित्‍या पूर्ण करून त्‍यामध्‍ये ऑल इंडिया टॉपर रँक प्राप्‍त केली आहे. 

विविध शैक्षणिक परिषदा, प्रशिक्षण कार्यक्रम, चर्चासत्रे, कार्यशाळांमध्‍ये सक्रिय सहभाग दिलेला आहे. ‘मराठी मानसशास्‍त्र परिषद’ या मानसशास्‍त्राच्‍या शिखर संस्‍थेच्‍या उपाध्‍यक्षपदी डिसेंबर 2025 मध्‍ये त्‍यांची नेमणूक झालेली आहे. कोरोना काळातील समुपदेशन सेवेकरिता ‘समाजभुषण’ पुरस्‍कार प्राप्‍त. रोटरी क्‍लब ऑफ नाशिक यांचेकडून ‘नेशन बिल्‍डर अवार्ड’ हा पुरस्‍कार त्‍यांना सप्‍टेंबर 2026 मध्‍ये प्राप्‍त झाला आहे.










































Dr. Yogesh D. Wankhede: Psychologist, Counsellor, Behavioral Trainer

  Dr. Yogesh D. Wankhede: Psychologist, Counsellor, Behavioral Trainer   डॉ. योगेश देविदास वानखेडे (मानसशास्‍त्रज्ञ, समुपदेशक व प्रशिक...